गणपतीपुळे समुद्रात निघाली श्रीराम यात्रा*__
_रत्नागिरी जिल्ह्यातील आराध्यदैवत असलेले आणि पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे अनोख्या पद्धतीने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा क्षण साजरा करण्यात आला. येथील वॉटल स्पोर्टस व्यावसायिक आणि स्थानिकांनी नौकांवर स्वार होत थेट समुद्रात श्रीराम यात्रा काढली. शिवाय गगनभेदी जय श्रीरामचा नारा देत किनार्यावर देखील ८ व्ही बाईकवरून यात्रा काढली, अशी माहिती अध्यक्ष उदय पाटील यांनी दिली.याचे आयोजन मोरया वॉटर स्पोर्टस आणि बीच असोसिएशन यांच्यावतीने करण्यात आले होते. सोमवारी सकाळी मालगुंड ते भंडारपुळे या ६ किमी समुद्रादरम्यान विविध प्रकारच्या नौकांवरून २०० हून अधिक जणांनी श्रीराम यात्रा काढली. यात प्रामुख्याने १८ जेट बोट होत्या. शिवाय ६ ड्रॅगन, १० स्पीडबोट आणि ५ सोफा बोटचा यात समावेश होता. यासोबतच एका पॅरासेलिंग बोटवरून भगवान श्रीरामाची ध्वजा फडकवण्यात आली. ही यात्रा संपन्न झाल्यावर किनार्यावर परतल्यावर एमटीडीसी किनारा ते गणपतीपुळे मंदिर व्ही बाईकवरून पुन्हा यात्रा काढण्यात आली. www.konkantoday.com