
चिपळुणात हजारो क्रिकेटप्रेमींचे स्वप्न साकार, पवन तलावावर टर्फ विकेटची निर्मिती.
चिपळूण शहरातील ऐतिहासिक अशा पवन तलाव मैदानावर सिझनचे प्रथम दर्जा, रणजी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे सामने खेळवले जातील, अशा प्रकारची टर्फ विकेट तयार झाली आहे. बुधवारपासून या टर्फ विकेटची चाचणी घेण्यासाठी सराव सामने सुरू झाले आहेत.शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारं न.पा. चं पवन तलाव हे ऐतिहासिक असं मैदान आहे. या मैदानावरून अनेक प्रथम दर्जाचे खेळाडू निर्माण झाले. परंतु गेल्या अनेक वर्षाची येथील क्रीडाप्रेमींची या ठिकाणी टर्फ विकेट व्हावी व त्यावर सिझनचे सामने व्हावेत, अशी मागणी होती. आता हे स्वप्न साकार झालं आहे. आमदार शेखर निकम यांनी पवन तलाव मैदान सुसज्ज करण्यासाठीचा निधी उपलब्ध करून दिला.www.konkantoday.com