
रत्नागिरी शहरात दहा जणांच्या विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त्या
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार रत्नागिरी शहरातील दहा जणांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या सर्व लोकांना शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व ओळख पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी अमोल पावसकर, योगेश पावसकर, संपदा रहाटे, सई नाचणकर, सचिन रसाळ, सचिन कोतवडेकर, प्राची लांजेकर, प्रकाश हातखंबकर, प्राजक्ता खेडेकर इत्यादींची विशेष कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
www.konkantoday.com