
दापोली तालुक्यातील नाभिक समाजाचा सलून सुरू करण्याचा निर्णय
दापोली :- (वार्ताहर)गेली तीन महिने उपसमारीत अडकलेल्या दापोली तालुक्यातील नाभिक समाज्यामध्ये अखेर आजपासून काळी फीत लावून सलून उघडण्याचा निर्णय घेतला आहे.या संदर्भात दापोली येथील सलून व्यवसायिक यांची दापोली शहरामध्ये तातडीची बैठक घेण्यात आली.शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून व्यवसाय करणार असून मास्क वापरणे,गिऱ्हार्ईकांची नोंद ठेवणे,साहित्य सेनेटाईज करणे गिऱ्हाईकामध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे आदी नियमांचे सलून व्यवसायिक पालन करणार असल्याचे यावेळी सर्वानुमते ठरले.या निर्णयामुळे सलून व्यवसायिक याना उभारी मिळणार असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.राज्यातील अनेक जिल्यामध्ये इतर व्यवसायावरील निर्बंध शासनाने शिथिल करून सलून व्यावसायिकांना पोट भरण्याचे साधन उपलब्ध करून दिले आहेत.
दापोलिमध्ये दरपत्रक केस कटिंग 70 रुपये व दाढी करणे 50 रुपये असा दर आकारला जाईल व इतर सुविधांवर 10% दरवाढ करण्यात आली आहे
यावेळी शहर गटाचे अध्यक्ष श्री.नरेश इंदुलकर, उप।ध्यक्ष श्री. प्रितम शिंदे, खजिनदार मंगेश कदम,सचिव रमेश शिंदे,रत्नाकर जाधव,सतीश चव्हाण योगेश दळवी अनिल कदम,शैलेश कदम निलेश शिंदे,शैलेश चव्हाण तसेच समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com