
स्वराज्य भूमी संघटनेतर्फे रत्नागिरी शहरात गेले काही दिवस सुरू असलेले आंदोलन स्थगित.
कोकणातील शेतकरी व समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वराज्यभूमी प्रतिष्ठानच्यावतीने गेले काही दिवस सुरु असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले उपोषणकर्त्यांनी ज्यूस घेवून उपोषण सोडले कोकणातील जनतेचे ज्वलंत प्रश्न या आंदोलनाच्या निमित्ताने अधिक प्रखर झाले. उपोषण सोडण्यापूर्वी काही वेळ रास्ता रोको करून आपल्या प्रश्नांकडे जनतेचे लक्ष वेधले. रास्ता राको हा लक्षवेधी असून यापुढे येऊ आणखी ताकदीने असा निर्धार करण्यात आला. हा लढा निर्णायक लढा असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील मच्छीमार, आंबा बागायतदार, बेरोजगार यांच्या प्रश्नांबाबत स्वराज्यभूमी संघटनेने आवाज उठवून खर्या अर्थाने कोकणचा आवाज शासनापर्यंत पोहोचविला आहे, असे म्हटले जात आहे. याबाबत बोलताना संजय यादवराव यांनी कोकणचे महत्त्वाचे प्रश्न असताना देखील कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली याबाबत जिल्हाधिकाऱ्यां बरोबर लवकरच बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले
