मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये टेस्ट करण्यासाठी अपॉईंटमेंटसाठी संपर्क साधणार्‍या रूग्णाच्या नातेवाईकाची १ लाख ८९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक, रत्नागिरीतील प्रकार

रत्नागिरी शहरातील राहणारे फिर्यादी यांचे भाऊ अब्दुल शकुर खान यांची मुुंबईतील एका रूग्णालयात बायोस्सी टेस्ट करण्यासाठी अपॉईंटमेंट घेण्यासाठी गुगलवरून मुंबई येथील हॉस्पिटलच्या मोबाईलवर संपर्क साधला असता समोरील अज्ञात व्यक्तीने  त्यांच्याकडून युपीआय नंबर टाकायला सांगून फिर्यादी यांच्या भावाच्या बँकेच्या खात्यातील १ लाख ८९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी यांचे भाऊ अब्दुल शकुर खान यांची बायोस्सी टेस्ट मुंबई येथील सुलतान प्रधान हॉस्पिटल मुंबई येथे करावयाची असल्याने या हॉस्पिटलची अपॉईंटमेंट घेण्यासाठी फिर्यादीचे ओळखीचे शकील मजगावकर यांनी गुगलवर सर्च करून सुलतान प्रधान हॉस्पिटल मुंबई यांचा मोबाईल नंबर दिला.
सदर नंबरवर फिर्यादीचा भाऊ नौशाद याने अपॉईंटमेंट घेण्यासाठी हॉस्पिटलच्या फोनवर कॉल केला असता अपॉईंटमेंटसाठी पाच रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करावे लागेल असे सांगून त्याकरिता हॉस्पिटलच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटची लिंक पाठवून ती ओपन करून त्यामध्ये पेशंटचे नाव व युपीआय नंबर टाकण्यास समोरील अज्ञात इसमाने सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीचा भाऊ नौशाद याने युपीआय नंबर टाकला. त्यानंतर फिर्यादी यांचा भाऊ नौशाद व अब्दुल खान हे मुंबई येथील सुलतान प्रधान हॉस्पिटल येथे गेले असता त्यांनी अपॉईंटमेंटबाबत विचारपूस केली असता तेथे ऑनलाईन अपॉईंटमेंट घेतली नसल्याचे सांगितले. त्यानंतर नौशाद यांनी आपल्या कॅनरा बँकेच्या खात्याच्या स्टेटमेंटमध्ये चेक केले असता वरील तारखेला वरील मोबाईलधारक इसमाने ऑनलाईन पद्धतीने फिर्यादीचे भाऊ नौशाद यांचे आकाऊंटमधील १ लाख ८९ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करून घेवून फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याचे उघड झाले. याबाबत त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button