
आमदार शेखर निकमांच्या हाकेने चाकरमानी पुन्हा एकवटले
संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द, कडवई, मुचरी, धामापूर जिल्हा परिषद गटातील चाकरमान्यांच्या मेळाव्यानंतर आमदार शेखर निकम यांनी कोसुंब जिल्हा परिषद गट आणि कसबा पंचायत समिती गणातील मुंबईस्थित चाकरमान्यांना विकासकामांचा आढावा आणि त्यावरील चर्चेसाठी हाक मारली आणि पुन्हा एकदा मुंबईकर चाकरमानी त्यांच्या हाकेला धावले. रविवारी अलोट गर्दीत चाकरमान्यांचा मेळावा उत्स्फूर्तपणे पार पडला.
गणेशोत्सवानंतर आमदार निकम संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकर चाकरमान्यांचे मेळावे मुंबईत येत आहेत. आतापर्यंतच्या मेळाव्याप्रमाणे रविवारचा दादर येथील कोसुंब व कसबा परिषद गटातील चाकरमान्यांचा मेळावाही प्रचंड गर्दीत पार पडला. www.konkantoday.com