
आक्षेपार्ह पोस्ट, रत्नागिरी, दापोली, चिपळूण, राजापुरात तणाव
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मंगळवारी रत्नागिरीसह दापोली, चिपळूण व राजापुरात समाजबांधवांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होवून संतप्त नागरिक पोलीस स्थानकांवर धडकले. दापोलीत आरोपींना जनतेसमोर आणून माफी मागायला लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमाव शांत झाला. चिपळुणात आक्षेपार्ह इन्स्टाग्राम स्टोरी, स्टेटस काही तरूणांनी ठेवल्याने या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना अटकही केली. तर राजापुरात पोलिसांनी या प्रकरणी सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका अल्पवयीन तरूणाला अटकही केली आहे. दरम्यान रत्नागिरीतही आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. www.konkantoday.com