
जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड तालुक्यातील आयनी फाटा येथे दुचाकीला झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या जयेश जयसिंग इप्ते (रा. खोपी) या दुचाकीस्वाराचा मुंबई-सायन येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ते आपल्या ताब्यातील दुचाकीने प्रवास करत असताना आयनी फाट्यानजिक अपघात घडला होता. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी लोटे येथील घरडा रूग्णालयात व त्यानंतर रत्नागिरीतील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी मुंबई सायन येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. www.konkantoday.com