पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली! PM मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते.गणेशपुजनानं या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राण प्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या अभिजात सुक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर दिग्गजांनी हजेरी लावली.
या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील सुमारे ७१४० हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले. अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, अरुण गोविल, नितीश भारद्वाज, मधुर भांडारकर, कतरिना-विकी कौशल यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित होते. तसेच सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले. उद्योगपती मुकेश अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासह उद्योगजगतातील मान्यवर उपस्थित होते. बागेश्वर बाबा यांच्यासह साधू-संत, महंत यांची विशेष उपस्थिती होती.
दरम्यान, सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन यांनी सुरुवातील रामनामाची स्तुती करणारी गीते सादर केली.
www.konkantoday.com