
उत्तरप्रदेशहून आणलेले ४७ कामगार सावर्डेत क्वॉरंटाईन
चिपळूण येथील खेर्डी एमआयडीसीतील थ्री एम पेपर मिलने ४७ कामगारांना उत्तर प्रदेश येथून एका बसमधून आणले होते. यानंतर जिल्हा बंदी असताना हे कामगार आले कसे? सोशल डिस्टंसिंगचे कोणते नियम पाळण्यात आले? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापक, बस चालक व ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुरूवारी या ४७ कामगारांना बसमधून सावर्डे वहाळफाटा येथील कोविड सेंटरमध्ये क्वॉरंटाईनसाठी नेण्यात आले. तेथे क्वॉरंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा उत्तर प्रदेशला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सुचनेनुसार पाठवण्यात येणार आहे.
konkantoday.com