खेड पोलीसांमार्फत ‘सोने-चांदी पॉलिश करून फसवणूक करणाऱ्या ‘आंतरराज्य टोळीस खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर व त्याच्या पोलीस दलाने केले अटक
संगलट (खेड)( प्रतिनिधी )
दिनांक 08/01/2023 रोजी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास खेड , तालुकीयातील एक ज्येष्ठ नागरिक महिला आपल्या राहत्या घरातील अंगणात उभ्या असताना एक अनोळखी इसम त्यांच्या घराच्या दरवाज्यावर येवून म्हणाला की, “तुम्हाला सोने-चांदी पॉलिश कारायची आहे का? मी तुम्हाला ते करून देतो, माझ्याकडे एक पावडर आहे.”
या ज्येष्ठ नागरिक महिला आधी सोने-चांदी पॉलिश करून घेण्यास तयार नव्हत्या परंतु या इसमाने अधिक जोर देऊन घरातील इतर चांदीच्या वस्तु असल्यास त्या पॉलिश करुन देतो असे सांगितल्यावरुन त्यांनी आपल्याकडील एक चांदीची वाटी पॉलिश करण्याकरीता दिली.
या नंतर त्या इसमाने या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या हातामध्ये कोणतेतरी पांढऱ्या रंगाचे खडे दिले आणि त्याचा वास त्यांना घेण्यास सांगून घरातून हळद आण्याकरीता सांगीतले व त्याचे एक मिश्रण तयार केले व त्यांच्या हातामधील सोन्याच्या बांगडया व पाटल्या मागीतल्या व या मिश्रणात टाकून या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या नाव-गाव बाबत विचारणा केली. या दरम्यान दूसरा एक अनोळखी इसम घरात आला व त्याने उजाला पावडर नावाची सोने-चांदी व पितळी भांडी पॉलिश करून देण्याची कपंनी असल्याचे सांगून लागलीच तेथून निघून गेला. थोड्या वेळाने या इसमाने त्यांना घरातून पाणी आणण्यास सांगीतले व घरातून पाणी आणेपर्यंत सदर अनोळखी इसम हा तेथून आपल्या ₹4,80,000/- इतक्या किमतीच्या 4 सोन्याच्या बांगडया व 2 सोन्याच्या पाटल्या घेऊन पळून गेला असल्याचे या ज्येष्ठ नागरिक महिलेच्या लक्षात आले.
फसवणूक झालेल्या या ज्येष्ठ नागरिक महिलेने दिल्या फिर्यादी वरून खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 09/2024 भा.द. वि. संहिता कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाणे येथील प्रभारी लोकप्रिय अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोयर हे आपल्या पथकासह या गुन्ह्याचा तपास करत होते व त्यांच्या पथका मार्फत या गुन्ह्यामध्ये जुन्या प्राप्त माहितीच्या व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून खालील नमूद आरोपी यांना मनमाड तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथून दिनांक 21/01/2024 रोजी ताब्यात घेण्यात आलेले आहे
तसेच आता पर्यंत झाल्या तपासामध्ये या सोने पॉलिश टोळीने महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात एकूण 21 महिलांची अश्या प्रकारे सोने चांदी पॉलिश करून देतो सांगून गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने नाशिक, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जालना व संभाजी नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
1) मोहंमद सुबेर इम्रान शेख, वय 28,
2) साजिद लाडू साह, वय 24,
3) मोहंमद आबिद इल्यास शेख, वय 29,
4) महमद जुबेर फती आलंम शेख, वय 32 (सर्व राहणार तुळसिपुर जमुनिया जिल्हा भागलपूर, राज्य बिहार) तसेच
5) नंदकुमार श्रीरंग माने वय 50 रा. मनमाड शिवाजी चौक तालुका नांदगाव जिल्हा नाशिक.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये असेही निष्पन्न झाले आहे की, खालील नमूद एकूण 3 इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये सदर आरोपी हे पाहिजे असलेले आरोपी आहेत.
- सावंतवाडी पोलीस ठाणे, जिल्हा सिंधुदुर्ग, गुन्हा नंबर 93/2018 IPC 406, 420,
- मिरज शहर पोलीस ठाणे, जिल्हा सांगली, गुन्हा नंबर 478/2019 IPC 406, 420 व
- कोडोली पोलीस ठाणे, जिल्हा कोल्हापूर, गुन्हा नंबर 180/2019 IPC 392, 34.
तसेच यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या टोळीने अश्या प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याबाबत अधिक तपास सुरु आहे. ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
1) श्री. नितीन भोयर, पोलीस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे, रत्नागिरी
2) पो.उनि श्री. रोहीदास केंद्रे, खेड पोलीस ठाणे
3) पो.कॉ/1291 श्री. अजय कडू, खेड पोलीस ठाणे
4) पो.कॉ/962 श्री. वैभव ओहोळ, खेड पोलीस ठाणे व
5) पो.हवा/444 श्री. रमिज शेख (स्था.गु.शा.).
www.konkantoday.com