वरिष्ठ सहाय्यक (लेखा) संवर्गाची किमान ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांची यादी
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) संवर्गाची किमान ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांची यादी https://www.zpratnagiri.org/ संकेतस्थळावर*
रत्नागिरी, दि. १८ (जिमाका) : जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट-क चे १८ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार ऑनलाईन परीक्षा संपन्न झालेल्या १३ संवर्गापैकी वरिष्ठ सहाय्यक (लेखा) या संवर्गाची एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची आयबीपीएस कंपनीकडून प्राप्त झालेली यादी जिल्हा परिषदेच्या https://www.zpratnagiri.org/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
ऑनलाईन परीक्षा संपन्न झालेल्या उर्वरीत संवर्गाची एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची यादी IBPS कंपनीकडून जसजशी प्राप्त होईल तसतशी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
www.konkantoday.com