चिपळूण हेल्प फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर
हेल्प फाऊंडेशन चिपळूण या संस्थेमार्फत पुरस्कार जाहीर झाले असून यावर्षी प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट डॉ. यतीन जाधव व प्राईम वुमन ऑफ द डिस्ट्रिक्ट सामाजिक कार्यकर्त्या सीमा चाळके यांना प्रदान करण्यात येणार आहे.
गेली १७ वर्षे हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. सामाजिक कार्यामध्ये विशेष योगदान देणार्या, तसेच मानवतावादी सेवा बजावणार्या व्यक्तीचा या पुरस्काराने यथोचित सन्मान करण्यात येतो. हा पुरस्कार वितरण सोहळा २० जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता हॉटेल अभिरूची येथील हॉलमध्ये आयोजित करण्यात आला असून यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, डीवायएसपी राजेंद्र राजमाने, उद्योजक प्रशांत यादव उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश कदम यांनी दिली.
www.konkantoday.com