दापोलीत महायुतीच्या बैठकीतून भाजपचे पदाधिकारी बाहेर
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमदार योगेश कदम, तसेच भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीतून केदार साठे यांच्यासह भाजप पदाधिकारीही बैठक सोडून बाहेर गेल्याने मोठी खळबळ उडाली. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशीच ही बैठक गोड होण्याऐवजी तिखट झाल्याने या सगळ्या प्रकारची चर्चा रंगली आहे. अखेर आमदार योगेश कदम यांनी काळी वेळातच दापोली भाजप कार्यालय गाठत या सगळ्या वादावर तूर्तास पडदा पाडला. यामुळे दापोली विधानसभा मतदार संघातील महायुतीची झालेली बैठक फार मोठ्या कोणत्याही चर्चेविना पार पडली आहे.www.konkantoday.com