आमदार राजन साळवी याच्या सह पत्नी अनुजा साळवी व मुलगा शुभम साळवी याच्या वर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आमदार राजन साळवी याच्या सह पत्नी अनुजा साळवी व मुलगाशुभम साळवी याच्या वर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याकडे गैर हिशोबी माल मत्ता असल्याचे माहित असून ही त्यांना प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्यावर लाचलुचपत विरोधी विभागामार्फत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १३(१) (ब) सह १३ (२) प्रमाणे तसेच
दरम्यान राजन साळवी याच्या वर व पत्नी,मुलगा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार राजन साळवी यांच्याकडे
३,५३,८९.७५२/- इतकी बेहिशोबी मालमता सापडली आहे.
या बाबत एसीबी ने दिलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की
१) श्री. राजन प्रभाकर साळवी, आमदार २६७ राजापूर विधानसभा मतदारसंघ
जि. रत्नागिरी (इतर लोकसेवक)
२) सौ. अनुजा राजन साळवी (पत्नी)
३) श्री शुभम राजन साळवी (मुलगा)
सर्व रा. साहेब बंगला, एम. एस. ई. बी. ऑफिसचे बाजूला, खालची आळी, रत्नागिरी, ता. जि.रत्नागिरी
घटनेचे ठिकाण
ऑक्टोबर २००९ ते ०२/१२/२०२२ या कालावधीमध्ये रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्हयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी
अपसंपदा रक्कम
ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकुण रु. ३,५३,८९.७५२/- इतकी अपसंपदा म्हणजेच ११८९६ % अपसंपदा संपदित केली
श्री. राजन प्रभाकर साळवी, आमदार २६७ राजापूर विधानसभा मतदारसंघ जि.रत्नागिरी तसेच त्यांची पत्नी सौ. अनुजा राजन साळवी, मुलगा शुभम राजन साळवी सर्व रा. साहेब बंगला, एम.एस.ई.बी. ऑफिसचे बाजूला, खालची आळी, रत्नागिरी, ता.जि. रत्नागिरी यांचेकडे रत्नागिरी शहर हद्दीत व रत्नागिरी जिल्हयामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्टोबर २००९ ते ०२/१२/२०२२ या कालावधीमध्ये असलेले ज्ञात उत्पन्न, खर्च व मालमत्ता विचारात घेण्यात येवून, त्यांच्या ताब्यात ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त एकूण ३,५३,८९,७५२/- रुपये इतकी अपसंपदा म्हणजेच ११८.९६ % अपसंपदा संपदित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे व त्याबाबतचा समाधानकारक खुलासा त्यांनी सादर केला नाही.
म्हणुन गैरअर्जदार श्री राजन प्रभाकर साळवी, आमदार २६७ राजापूर विधानसभा मतदारसंघ जि. रत्नागिरी यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १३(१) (ब) सह १३ (२) प्रमाणे तसेच गैरअर्जदार श्री. राजन प्रभाकर साळवी यांची पत्नी सौ अनुजा राजन साळवी, मुलगा शुभम राजन साळवी यांनी नमूद मालमत्ता ही अपसंपदा आहे हे माहित असूनही त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचे स्वतःचे नावे मालमत्ता धारण करून कब्जात बाळगणे कामी श्री. राजन प्रभाकर साळवी आमदार, यांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन दिले.
म्हणुन रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर. २४/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन २०१८) चे कलम १२ प्रमाणे आज दिनांक १८/०१/२०२४ रोजी ०९.०८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास श्री. सुशांत चव्हाण पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. रत्नागिरी हे करीत आहेत,
www.konkantoday.com