
उत्तर द्या! आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून नवी मोहीम
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर 16 जानेवारी रोजी ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत जुने व्हिडीओ दाखवत ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पुराव्यासह जोरदार हल्ला करण्यात आला. यानंतर आता ठाकरे गटाने उत्तर द्या! असे म्हणत नवी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ठाकरे गटाने भाजपा, निवडणूक आयोग आणि एकनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करत ठाकरे गटाने म्हटले की, उद्धव ठाकरे जर पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष नव्हते, तर भाजपाने 2014 लोकसभा आणि 2019 च्या दोन्ही निवडणूकांमध्ये पाठींबा का मागितला? अशा आशयाचे ट्वीट करत एक बॅनर पोस्ट केला आहे. त्यात म्हटले की, उद्धव ठाकरे पक्षाध्यक्ष नव्हते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी चर्चा का करीत होते? उद्धव ठाकरेंच्या पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना कसे दिले गेले? उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना दिलेले एबी अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाने कसे स्वीकारले? शिंदेसह अन्य नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेली पदे कशी स्वीकारली? असा प्रश्नांचा भडीमार केला आहे.
उद्धवसाहेब जर पक्षप्रमुख किंवा पक्षाध्यक्ष नव्हते, तर भाजपने २०१४ लोकसभा आणि २०१९ च्या दोन्ही निवडणूकांमध्ये पाठींबा का मागितला?उत्तरद्या
www.konkantoday.com