कोकणातील शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी-अजित यशवंतराव
अवकाळी पावसामुळे कोकण भागाला मोठा फटका बसला आहे. आंबा, काजू व हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले असून येथील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. कोकणातील शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी, याबाबतचे निवेदन अजित यशवंतराव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
www.konkantoday.com