
आई रागाने बोलल्याने ११ वर्षीय मुलगा घरातून गेला निघून
रत्नागिरी शहरालगतच्या कारवांचीवाडी येथे आई रागाने बोलल्याने ११ वर्षीय मुलगा राहत्या घरातून बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिराज राजेश पवार (११, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी), असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अभिराज याच्या आईने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जानेवारी रोजी दुपारी अभियाज याचे जेवणावेळी पापड खाण्यावरून बहिणींशी भांडण झाले होते. यावेळी अभिराज याचे आईने त्याला तुला काही शिस्त वगैरे आहे की नाही, असे रागाने बोलली. यावरून अभिराज हा आपली सायकल घेवून कुठेतरी निघून गेला. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. अभिराज याचा शोध घेण्यात आला. मात्र त्याची माहती मिळू शकली नाही. www.konkantoday.com