
सचिव आणि चेअरमन यांच्यात वाद होऊन चेअरमननी संस्थेच्या सचिवास संस्थेच्या इमारतीमध्ये कोंडून ठेवल्याची तक्रार
____आसगे सोसायटीचे सचिव आणि चेअरमन यांच्या वाद होऊन चेअरमन यांनी संस्थेच्या सचिवास संस्थेच्या इमारतीमध्ये कोंडून ठेवून त्याला शिवीगाळ केली .या प्रकरणी सोसायटीचे चेअरमन दिलीप चौगुले यांच्यावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना बुधवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी दहा वाजता आसगे येथे घडली होती . याबाबतची फिर्याद संजय लक्ष्मण रांजणे( वय ५७ राहणार लांजा कनावजेवाडी, मूळ राहणार संगमेश्वर धामणी) हे आसगे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. आसगे सोसायटीची मासिक मीटिंगची तयारी करण्यासाठी संजय रांजणे हे बुधवार दिनांक २० मार्च रोजी सकाळी १० वाजता सोसायटीच्या इमारतीमध्ये आले होते. यावेळी त्या ठिकाणी संस्थेचे चेअरमन म्हणून काम करणारे दिलीप गुंडोपंत चौगुले (राहणार आसगे टोळेवाडी सध्या राहणार लांजा सीनियर कॉलेज समोर) हे त्या ठिकाणी आले. दिलीप चौगुले यांनी संस्था सचिव संजय रांजणे यांच्याकडे पाच लाख रुपयांचे मागितले होते. ते त्यांनी दिले नाहीत या कारणावरून दोघांच्यात वाद सुरू होता. या रागातून चेअरमन चौगुले यांनी संस्था सचिव रांजणे यांना संस्थेच्या इमारतीत कोंडून ठेवून दरवाजाला कुलूप लावून त्याला शिवीगाळ केली.या प्रकरणी संजय रांजणे यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी दिलीप चौगुले यांच्यावर भादवि कलम ४४२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस एस भुजबळराव करत आहेत.www.konkantoday.com