
उपसा केलेले गढूळ पाणी जॅकवेलमध्ये जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी पुलाचे काम बंद पाडले.
चिपळूण तालुक्यातील कोंढे-करंबवणे मार्गावर सध्या खोपड-कालुस्ते पुलाची पुनर्बांधणी केली जात आहे. मात्र पुलाचे काम करताना तेथील उपसा केलेले गढूळ पाणी थेट जवळच्या कालुस्ते खुर्द ग्रामपंचायतीच्या जॅकवेलमध्ये जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावात गढूळ पाणी नळाला येत असल्याने आणि ठेकेदारांना समज देवूनही दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर मंगळवारी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी पुलाचे काम बंद पाडले. उपाययोजना केल्यानंतरच पुढील काम करण्याची तंबी देण्यात आली आहे.www.konkantoday.com