मच्छिमारांना तातडीने आर्थिक मदतीचे पॅकेज न दिल्यास आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच किनारपट्टीवरील मच्छिमारांना समुद्रात मासळी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात मत्स्य दुष्काळाच्या झळा सर्वांना सोसाव्या लागत आहेत. गिलनेट, रापण, ट्रॉलर, पर्ससीन याचबरोबर इतरही मासेमारी प्रकारात मच्छिमारांना मासळी मिळत नसल्याने सर्वच मच्छिमार आज कर्जबाजारी होवून हवालदिल बनले आहेत. मासेमारी हंगाम सुरू होवून कधी संपला हेही आता मच्छिमारांना समजून येत नसल्याने शासनाने मच्छिमारांना तातडीने आर्थिक मदतीचे पॅकेज न दिल्यास अनेक मच्छिमार कर्जबाजारी होवून आत्महत्या करण्याची भीती आहे. मच्छिमारांच्या समस्येकडे तातडीने शासनकर्त्यांनी लक्ष न दिल्यास मार्च महिन्यापर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत, त्यानंतर कधीही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मच्छिमार सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
www.konkantoday.com