रत्नागिरीत स्कायवॉकवरीलकाही ठिकाणी पत्रा पुरता गंजला
रत्नागिरी शहरातील स्कायवॉकवरील पत्र्याची दयनीय अवस्था झाली आहे. कारण या स्कायवॉकवर काही ठिकाणी पत्रा पुरता गंजला असून गंजलेल्या पत्र्यामधून खालील रस्ता दिसतो आहे. त्यामुळे अनावधानाने जर कोणाचे चालताना दुर्लक्ष झाल्यास थेट पाय पत्र्याच्या आरपार जावू शकतो व त्याला गंभीर इजा होवू शकते. त्यामुळे याकडे नगर परिषदेने तातडीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
माळनाका परिसरात असणार्या स्कायवॉकवर अनेकदा शाळकरी मुलांसोबतच अन्य नागरिक फिरत असतात. तर काहीजण स्कायवॉकवरून शहराचा व्ह्यू घेत असतात. मात्र स्कायवॉकवर चालताना काही ठिकाणी पत्रा गंजला आहे. स्कायवॉकच्या देखभालीवर खर्च करणे आवश्यक आहे. www.konkantoday.com