
शरद पवार यांनीच माझ्या लोकसभेच्या उमेदवारीची उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली- अनंत गीते यांचा खळबळ जनक दावा
अंनंत गिते यांनी मोठं आणि धक्कादायक विधान केलं आहे. मी भाग्यवान आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच लोकसभेच्या उमेदवारीची उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली आहे. सुनील तटकरेंना गाडायचं आहे.सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं. त्यामुळे मला तटकरेंना गाडायचं आहे, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं असून त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस केली आहे, असा खळबळजनक दावा अनंत गिते यांनी केला आहे. गिते यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अनंत गिते हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी गिते यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाभरात राजीनामा देणार आहेत. त्यांचे 16 आमदार अपात्र होतील. निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. आपलेच दिवस परत येणार आहेत, असं अनंत गिते यांनी म्हटलं आहे. गिते यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
www.konkantoday.com