
कुरतडेत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे कातळवाडी येेथे विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. साधारणपणे ४ ते ५ वर्षाचा असलेला बिबट्या हा मादी असून भक्ष्याचा पाठलाग करताना तो विहिरीत पडला असावा, असे वनविभागाकडून सांगण्यात आले. सुस्थितीत असलेल्या या बिबट्याला तत्काळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ जानेवारी २०२४ रोजी कुरतडे कातळवाडी येथील मंगेश फुटक यांच्या घराजवळील विहिरीमध्ये पडला असल्याचे स्थानिकांना आढळून आले. त्यानुसार या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. बिबट्या विहिरीमध्ये पडला आहे, हे समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी कर्दी या विहिरीजवळ केली मात्र वनविभागाने घटनास्थळावरून केवळ दीड मिनिटात या बिबट्याला विहिरीमधून सुखरूप बाहेर काढले. www.konkantoday.com