
कोकणच्या विविध भागात ३ लाख वृक्षांची लागवड करणार ः जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण
रत्नागिरी ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. सुमारे ३ लाख वृक्ष लागवडीची प्रक्रिया शिल्लक असून ती प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. सुनिल चव्हाण यांनी दिली. मार्लेश्वर, गणपतीपुळे, परशुराम, नाणिज, पावस देवस्थानसह जिल्ह्यातील १७ रेल्वे स्टेशन, न्यायालयाची इमारत, शासकीय, निमशासकीय कार्यालय, एमआयडीसी, सिंचन प्रकल्प, नदी, खाड्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वरील सर्व ठिकाणी नवीन रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. सुनिल चव्हाण यांनी सांगितले.