
कोकण रेल्वेच्या परिसरात आज एअर स्ट्राईक चा मॉक ड्रिल.
कोकण रेल्वेच्या परिसरात आज एअर स्ट्राईक चा मॉ क ड्रिल करण्यात आला.रेल्वे आणि परिसरात झालेल्या हल्या नंतर कोकण रेल्वेची यंत्रणा तात्काळ घटना स्थळी पोहोचली…कोकण रेल्वेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.



घडलेल्या घटनेची माहिती पोलिस,अग्निशामक,आरोग्य सह आवश्यक विभागांना देण्यात आली.रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रेल्वे आणि बाहेरील जखमीला आपत्कालीन स्थितीत उभारण्यात आलेल्या तंबूत हलवून प्रथमोपचार करण्यात आले.यानंतर दाखल झालेल्या रुग्णवाहिकेतून जखमींना अधिक उपचाराकरिता हलवण्यात आले.रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचा आरोग्य,अग्निशाtमक,पोलिस विभाग यंत्रणेसह दाखल झाला.



