
जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक संपावर
आशा व गटप्रवर्तक महिला यांनी प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. जोपर्यंत शासन मागण्यांचा जीआर काढत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका या महिलांनी घेतली आहे. जिल्ह्यातील जवळपास १ हजार २०० आशा व कटप्रवर्तक महिला संपात सहभागी झाल्या आहेत.
गेली अनेक वर्षे आशा व गटप्रवर्तक महिला आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन महिन्यांपूर्वी या महिलांनी बेमुदत संपाची हाक दिली होती. त्यानुसार महिनाभर हा संप चालला. यासंदर्भात ८ नोव्हेंबर रोजी सन्माननीय तडजोड झली. त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाहीत. या घटनेस दोन महिने झाले आहेत. तरी अद्याप महाराष्ट्र शासन काही निर्णय घेणयास तयार नसल्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरूद्ध संतोष वाढत चाललेला आहे.
महिनाभर संप केल्यानंतर पुन्हा २९ डिसेंबरपासून ऑनलाईन कामावरही बहिष्कार टाकला होता. आता शुक्रवारपासून बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत होणार आहे. अंगणवाडी सेविकानंतर आता आशासुद्धा संपावर गेल्याने ग्रामीण भागावर याचा चांगलाच परिणाम झाला आहे.
www.konkantoday.com