चिपळूण नगर परिषदेचे खत झाले ब्रँडेड
नगर परिषदेच्या शहरातील शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पात ओल्या कचर्यापासून तयार होणारे खत आता ब्रँडेड झाले आहे. या खताला शासन स्तरावरून हरित महासिटी कंपोस्ट ब्रँड प्राप्त झाले आहे. दर चार दिवसांनी २ टन खत तयार होत असून आतापर्यंत १० टन खत येथे उपलब्ध आहे. त्याची विक्री सुरू करण्यात आली आहे.
नगर परिषदेचे सफाई कामगार शहरातून दरदिवशी १५ टन कचरा उचलतात. हा कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून शिवाजीनगर प्रकल्पात नेला जातो. त्यात सुमारे ७ टन ओला कचरा असतो. या कचर्यावर घन कचरा प्रक्रिया केंद्रावर असलेल्या ऑरगॅनिक वेस्ट कंपोस्ट मशीन व बायोगॅसद्वारे प्रक्रिया होते. त्यातून दर चार दिवसांनी २ टन खत तयार होते. या खताचा शेतकर्यांना, नागरिकांना फायदा व्हावा, त्याची विक्री करता यावी म्हणून हे खत तपासणीसाठी कोल्हापूर खत नियंत्रण प्रयोगशाळेकडे पाठवले होते. www.konkantoday.com