
गोवा राज्य आज २ जुलै पासून पर्यटकांसाठी खुंले
कोरोना संसर्गानंतर देशभरात सुरु असेलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या ४ महिन्यापासून बंद असलेलं गोवा राज्य आज २ जुलै पासून पर्यटकांसाठी खुंल करण्यात आल्याची माहिती गोव्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली आहे. गोवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार २५० हॉटेल्सना परवानगी देण्यात आली आहे. विशेषत: पर्यटनावर असलेली गोव्याची आर्थिक घडी यामुळे कुठेतरी सुधारण्यास मदत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या फक्त देशांतर्गतच पर्यटनाला संमती देण्यात आली आहे. यासाठी पर्यंटकांना काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
www.konkantoday.com