
काँक्रिटीकरणाच्या कामासाठी करूळ घाटमार्ग सोमवारपासून (ता.१५) बंद करण्यात येणार?
काँक्रिटीकरणाच्या कामासाठी करूळ घाटमार्ग सोमवारपासून (ता.१५) बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या महामार्गावरील अवजड वाहतूक फोंडा आणि अणुस्करा घाटमार्गे करण्याचे नियोजन असून हा मार्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे. भुईबावडा घाटमार्गे केवळ प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी मिळणार आहे.
तळेरे-कोल्हापूर महामार्ग काँक्रिटपासून करण्याचा पहिला आणि दुसरा सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १८ किलोमीटरसाठी १७१ कोटी रुपये मंजूर होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात तळेरे-गगनबावडा मार्गावरील २१ किलोमीटर रस्त्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली होती. यातील १६ किलोमीटरचा रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर पाच किलोमीटर गगनबावडा तालुक्यात आहे. जिल्ह्यातील १६ पैकी साडेनऊ किलोमीटर करूळ घाटररस्ता काँक्रिटपासून होणार आहे. त्याची रुंदी १० मीटर आहे. घाटात अरूंद ठिकाणी महिनाभरापासून दरडी तोडून रूंदी वाढविण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात घाटरस्त्यांमध्ये मोरी बांधकाम होणार आहे. त्यामुळे महामार्ग बंद ठेवल्याशिवाय रस्ता खोदाई शक्य नसल्याने महामार्ग प्राधिकरणने रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली होती.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात परवानगी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा प्राधिकरणाने परवानगी मागितली आहे. सोबत पोलिस विभागाचा अहवाल दिला आहे.
www.konkantoday.com