नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी रत्नागिरी महायुतीचे नेते पदाधिकारी यांची एकजूट१४ जानेवारीला रत्नागिरीत महायुतीचा संयुक्त जिल्हा मेळावा:-उदय सामंत
महायुतीच्या समन्वयक यांच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शना खाली आज राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या तीन पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अनेकदा आपण आपसापसात भांडत बसतो मात्र जर आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचा असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत त्यासाठी आपला नेमका शत्रू कोण आहे हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे असे सूचक उद्गार राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे झालेल्या महायुतीच्या समन्वय समितीच्या सभेत काढला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा होण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करा असे आदेश या बैठकीत उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना दिले.१४ जानेवारी ला महायुतीचा संयुक्त जिल्हा मेळावा रत्नागिरी घेतला जाणार असेल्याची माहिती यासभेत देण्यात आली.पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये कटुता येणार नाही यांची काळजी घेण्याची गरज असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा महायुती मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक गुरुवारी रत्नागिरी येथे मोठा उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत उदय सामंत यांनी सर्वांना एकत्र पुढे जाण्याचे आवाहन केले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान पदावर पाहण्यासाठी सर्वजण धडपडत आहेत.त्यासाठीच मिशन 48 ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जर सर्वांचा उद्देश एकच आहे तर सर्वांनी एकत्र राहूनच काम करायला हवे असे ते म्हणाले. आपापसात काही मत मतांतर असतील तरी आपापल्या पक्षाच्या समन्वयक्यांमार्फत त्यावर तोडगा काढायला हवा. ही समिती लोकसभेसाठी नाही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती अश्या विविध निवडणुकीसाठी काम करून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडेल.
या समन्वय सभेच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे समन्वयक आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, भाजपाचे समन्वयक माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार, शिवसेना उपनेते – पक्षाचे समन्वयक सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, बिपिन बंदरकर,पूजाताई निकम,अण्णा कदम, सुदेश मयेकर,यांच्या सहित तिन्ही पक्षाचे जिल्हा प्रमुख, महिला जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख,सर्व पदाधिकारी उपस्थिती होते.
www.konkantoday.com