उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहायक महेश सामंत यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया रत्नागिरीमध्ये यशस्वी

रत्नागिरी : रत्नागिरीतील सुप्रसिद्ध जनरल व लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉक्टर अभिजीत पाटील यांनी चिरायु हॉस्पिटलमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहाय्यक महेश सामंत यांच्यावर लाळ ग्रंथीवरील ट्यूमरची ३८ टाक्यांची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातील या रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यामुळे पेशंटला मोठा दिलासा मिळाला आहे.
पॅरोटेड ग्रंथी ही आपल्या लाळ ग्रंथी पैकी एक मुख्य लाळ ग्रंथी असते. या पेशंटमध्ये ट्युमर मोठा असल्याने ही शस्त्रक्रिया अधिक क्लिष्ट होती. या ट्यूमरच्या खालच्या बाजूलाच चेहर्‍याच्या संवेदना पोचवल्या जाणार्‍या पाच नसा असतात. त्या नसांना इजा न पोचविता पूर्णपणे गाठ काढणे हे अतिशय आव्हानात्मक काम होते. रत्नागिरीतील जनरल व लॅप्रोस्कोपीक सर्जन डॉक्टर अभिजीत पाटील आणि भुलतज्ज्ञ डॉक्टर गुरुदास दांडेकर आणि त्यांची टीम यांनी साधारणत: चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर पेशंट भूलीतून बाहेर आल्यावर त्याच्या चेहर्‍याच्या हालचाली समांतर आहेत की नाही हे चेक करून पेशंटला वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले.
प्लेओमॉर्फिक एडेनोमा हा लाळ ग्रंथीचा एक ट्यूमर सामान्यता सर्वत्र आढळला जातो. सुरुवातीला तो वेदनारहीत गाठ म्हणून वाढतो. वेळेवर उपचार न घेतल्यास तो मोठा होतो ज्यामुळे चेहर्‍याच्या रचनेत बदल होऊ शकतो. व त्याचे रूपांतर कालांतराने दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगात होण्याची शक्यता असते.
याची काही मुख्य लक्षणे म्हणजे कान किंवा जबड्याच्या मागे एक वेदना रहित किंवा हळूहळू वाढणारी गाठ, चेहर्‍यावरील असमानता, गाठ मोठी झाल्यास क्वचित प्रसंगी दुखणे व चेहर्‍याच्या मज्जातंतूवर दाब पडणे. इत्यादी लक्षणे सामान्यता दिसून येतात. त्यामुळे यावर प्रभावी उपचार म्हणजे शस्त्रक्रिया असते. ट्यूमर पूर्णपणे काढल्याने तो पुन्हा येण्याची शक्यता कमी होते. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कोकणातील रुग्णांना आता अशा उपचारांसाठी मुंबई किंवा पुण्यात जायची गरज नाही अशाच विविध प्रकारच्या जटील व दुर्धर आजारांवरील शस्त्रक्रिया चिरायु हॉस्पिटलमध्ये होत असल्याने रत्नागिरीवासियांसाठी चिरायु हॉस्पिटल हे वरदान ठरलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button