किनाऱ्यावरील प्राणी, पक्षी, वनस्पतींची नोंद करा


प्रदीप पाताडे ; सागर महोत्सवात भाट्ये किनारा सहल



रत्नागिरी, ता. १२ : आपल्या जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर आठवड्यातून एक-दोनदा फेरी मारा. तिथे दिसणाऱ्या प्राणी, मासे, खेडके, कीटक, पक्षी यांची नोंद करून ठेवा. त्याचा फोटोसुद्धा काढून ठेवा. या नोंदी इंटरनेटवर अपलोड करा म्हणजे सर्व पर्यावरणप्रेमी, अभ्यासकांना याची माहिती मिळेल, अशी सूचना आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित सागर महोत्सवातील समुद्रकिनारा अभ्यास सहलीत कोस्टल कॉंन्झर्वेशन फाउंडेशनचे अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी केली. आज सकाळी भाट्ये किनाऱ्यावर जवळपास १०० विद्यार्थी, पर्यावरणप्रेमींनी यात भाग घेतला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ९ या वेळेत भाट्ये किनाऱ्यावर सहल काढली. प्रदीप पाताडे म्हणाले की, मरीन लाईफ ऑफ मुंबई हे फेसबुक पेज आहे. त्यावर आम्ही आठवड्यातून एक फोटो अपलोड करतो. त्यावर तज्ज्ञ माहिती देतात. डॉक्युमेन्टेशन फार महत्वाचे आहे. किनाऱ्यावर दिसणारे प्राणी, पक्षी आय नेचरलिस्ट या अॅपवर अपलोड करा. हा डाटा अभ्यासासाठी उपयुक्त ठरतो. संशोधकांना एकाचवेळी माहिती मिळते. रत्नागिरीमध्ये अनेक समुद्रकिनारे आहेत. त्यांचा अभ्यास करणे शक्य आहे. भाट्यात आज सरगॅसम, शेल बायंडर वर्म, सॅंड बबलर क्रॅबनी वाळूत केलेली बिळं, घोस्ट क्रॅब या वेळी पाहायला मिळाली. खारफुटीची वाहून आलेली बी सुद्धा आढळली. येथे जैवविविधता भिन्न आहे. वाळूच्या खाली राहणारे छोटे प्राणी बरेच आहेत.येथे जैवविविधता भिन्न आहे. वाळूच्या खाली राहणारे छोटे प्राणी बरेच आहेत.
डॉ. अमृता भावे यांनी सांगितले की, जीवंत शिंपले, वेगवेगळ्या प्रकारचे खेडके, सी वीड प्रकारातील वॉशटॉक, लाटेबरोबर वाहून आलेले अल्गी, वेगवेगळ्या प्रकारचे शंखशिंपले, वाळूचे प्रकार, छान छान पक्षीसुद्धा दिसले. इथले प्राणी येथे पाणी असो वा नसो ते जगू शकतात. पांढरी वाळू, काळ्या वाळूचे किनारे रत्नागिरीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button