सोन्याचे दागिने लुटणार्या २ चोरट्यांचा शोध सुरूच
खेड तालुक्यातील भरणे शिवनेरी नगर येथील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस सोन्याचे दागिने पॉलिश करण्याचे आमिष दाखवत पावणे पाच लाखांचे दागिने लुटणार्या दोन अज्ञात चोरट्यांचा येथील पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
भरणे-शवनेरीनगर येथील शितल प्रकाश शिवलकर यांनी सोमवारी रात्री उशिरा येथील पोलिसांत दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या घराच्या अंगणात उभ्या असताना २ अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजावर येवून सोने पॉलिश करून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. या दरम्यान त्यांच्या हातातील २ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या, २ लाख ४ हजार रु. किंमतीच्या दोन सोन्याच्या पाटल्या असा ४ लाख ८० हजार रू. किंमतीच्या सोन्याच्या ऐवजासह पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर व सहकार्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यानंतर नाकाबंदी करत पलायन केलेल्या २ चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
www.konkantoday.com