ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर तुडतुडे व फुलकिडीची तर काजूवर ढेकण्या आणि फुलकिडींचा प्रादुर्भावाची शक्यता बागायतदारांनी काळजी घेण्याचे आवाहन


*रत्नागिरी दि. १० (जिमाका) : सद्यस्थितीमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. ढगाळ वातावरण व पावसानंतर वातावरणामध्ये होणारा बदल किडींच्या वाढीसाठी अनुकूल आहे. तरी अशा परिस्थितीमध्ये आंबा पिकावर तुडतुडे व फुलकिडी तसेच काजू पिकावर काजूवरील ढेकण्या आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तरी आंबा व काजू बागायतदारांनी आपल्या बागेची नियमितपणे पाहणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
तुडतुडयांनी आर्थिक नुकसानीची पातळी (१० तुडतुडे प्रति पालवी / मोहोर) ओलांडली असल्यास व ज्याठीकाणी पिक पालवी अवस्थेत असेल अशा ठीकाणी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ०९ मि.ली. प्रती १० लिटर पाणी, पिक बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. प्रती १० लिटर पाणी व पिक मोहोर अवस्थेत असल्यास इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ३ मि.ली. किंवा ब्युप्रोफेझिन २५ टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाणी तसेच जर फळे वाटाण्याच्या आकाराची अथवा त्याहून मोठी असल्यास थायोमेथॉक्झाम २५ टक्के १ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी याप्रमाणात वापरावे. फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास सदर कीडींच्या व्यवस्थापनाकरीता स्पिनोसॅड ४५ टक्के प्रवाही २.५ मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५ टक्के २ ग्रॅम प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. (सदर कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत). तसेच काजूमध्ये ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने पालवी, मोहोर व फळधारणा झाली असल्यास त्याची पाहणी करावी. सदर किडींचा प्रादुर्भाव आढून आल्यास दोन्ही किडींच्या व्यवस्थापनासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ६ मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मि.ली. यापैकी एका किटकनाशकाची प्रति १० लि. पाण्यातून फवारणी करावी.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button