सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात आज (दि.८) सायंकाळी ४.३० ते ६.४५ च्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली.
तर पावसामुळे सध्या मोहरावर असलेल्या काजू व आंबा पिकांना फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गांतून व्यक्त होत आहेत.
मागील दोन दिवस अधूनमधून ढगाळ वातारण होते. आज सायंकाळी अचानक अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. विशेषतः सह्याद्री पट्ट्यातील करुळ, कुंभवडे, करुळ, नावळे, सडुरे या परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावासाने अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर हवेत मात्र गारवा निर्माण झाला. या पावसामुळे सध्या मोहराला आलेली आंबा व काजू पिकांना फटका बसणार आहे.
www.konkantoday.com