
दापोली न.पं.तीने गेल्या वर्षीचे टँकरचे ४० लाखाचे बिल थकविले
दापोली शहराला गेल्या वर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ नगर पंचायतीवर आली होती. मात्र या टँकर मालकाचे गेल्या वर्षीचे सुमारे ४० लाख रुपये बिल अजून थकित आहे. शिवाय दापोली शहराला पाणीपुरवठा करणार्या नारगोली येथील बंधार्यातील पाण्याने तळ गाठला आहे. यामुळे काही दिवसात जर दापोलीला टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली तर नगरपंचायतीसमोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहणार आहे. यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत.शहराला गेल्यावर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र या टँकर मालकांचे गेल्या वर्षीचे सुमारे ४० लाख रुपये बिल थकित आहे. नगरपंचायत स्वनिधीतून या टँकर मालकांची थोडी थोडी देणी देत आहे. मात्र अद्याप ४० लाख रुपये देणे बाकी असल्यामुळे यंदा नगरपंचायतीला टँकर मालक टँकर उपलब्ध करून देतील का अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. www.konkantoday.com