
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. मकरंद साखळकर
कोकणातील यशस्वी यशाची परंपरा कायम ठेवणार्या गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. मकरंद साखळकर यांची निवड झाली आहे.
या आधी प्राचार्यपदी डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी होते. तर प्रशासकीय उपप्राचार्य म्हणून डॉ. मकरंद साखळकर होते. मात्र त्यांची आता स्वायत्त असलेल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी निवड झाली आहे.
प्रा. डॉ. साखळकर यांना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मिळाला आहे. तसेच वाणिज्यचे प्राध्यापक असलेले डॉ. साखळकर हे मुंबई विद्यापीठातील लेखाशास्त्र विषयातील वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पीएचडीसाठी संशोधन मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाने २ विद्यार्थ्यांना पीएचडीही प्रदान केली आहे. www.konkantoday.com