किरण सामंत यांच्या मी मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कौन बॅनर वरून पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मित्र पक्ष असलेले शिंदे गट व भारतीय जनता पक्ष रत्नागिरी लोकसभा मतदार संघात समोरासमोर ठाकले आहेत सध्या या मतदारसंघात विनायक राऊत हे ठाकरे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्या विरोधात कोणी निवडणूक लढवायचे यावरून भाजप व शिंदे गटात जोरदार रस्सीखेच चालू आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ शिंदे गटालाच मिळेल असे वारंवार सांगितले आहे या मतदारसंघातून त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे इच्छुक आहेत उदय सामंत यांनीही बऱ्याच वेळेला किरण सामंत यांच्या उमेदवारीबाबत जाहीर वक्तव्य केले आहे मात्र या मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष देखील इच्छुक असून त्यांनी ही मोर्चे बांधणी सुरू केली आहे या मतदारसंघातून तगडा उमेदवार पाहिजे म्हणून भाजपच्या वतीने राज्यातले मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे येत आहे मतदार संघातून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा भाजपचा दावा आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील हा मतदार संघ भाजपचाच आहे असे नुकतेच जाहीर केले आहे काही दिवसापूर्वी किरण सामंत यांनी मी मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कौन अशा आशयाचा स्टेटस ठेवला होता त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती मात्र त्यानंतर किरण सामंत यांनी आपण उमेदवारीसाठी इच्छुक असून मात्र पक्ष ज्या उमेदवाराला उमेदवारी देईल त्याचा आपण प्रचार करू असे जाहीर केले होते रवींद्र चव्हाण आपले मित्र असून त्यांना उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांचा प्रचार करू असे जाहीर केले होते किरण सामंत यांचा सात जानेवारीला वाढदिवस असून त्यानिमित्ताने शहरात विविध पोस्टर्स लावण्यात आले आहे मात्र या पोस्टर पैकी मी मी किरण रवींद्र सामंत रोकेगा कौन या भव्य पोस्टर ने परत एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे
www.konkantoday.com