कापसाळ येथे घरी चोरी करणारा नातेवाईकच निघाला ,संशयिताच्या कोठडीत वाढ
चिपळूण:- कापसाळ येथे नातेवाईकांच्याच घरात चोरी करून १२ लाख ८० हजारांचे दागिने व इतर ऐवज चोरीप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला मुंबईतून न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले आहे. संशयिताला काल मंगळवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी तिन्ही चोऱ्यांची उकल केली असून ८ लाख ७३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, कापसाळ दुकानखोरी येथील अमोल साळवी यांचे ५ लाख ८ हजारांचे दागिने, जयश्री अवधूत साळवी यांचे ५ लाख ३६ हजारांचे दागिने तर स्नेहल सचिन सावंत यांचे २ लाख ३६ हजारांचे दागिने चोरीस गेले होते. हे दागिने ओंकार अनिल साळवी (२८, रा. दुकानखोरी, कापसाळ) यानेच चोरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हे सर्व फिर्यादी संशयिताचे नातेवाईक आहेत. नातेवाइकांच्या घरातच चोरी केल्या प्रकरणी ओंकार साळवीला मुंबईत साकीनाका पोलिसांनी अटक केले होते. तेथे न्यायालयीन कारवाई सुरू असताना कापसाळ येथील चोरीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
www.konkantoday.com