रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू
राज्य शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे जिल्ह्यात ११ ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.या बैठकांमध्ये जिल्ह्यातील ४७ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला सत्यवान कदम, दीपक देवल, देवेंद्र झापडेकर, स्वप्नील भिडे उपस्थिती हाेते. घनवटकर यांनी सांगितले की, मंदिराचे पावित्र्य रक्षण आणि भारतीय संस्कृती यांचे पालन व्हावे, या उद्देशाने मंदिरामध्ये भाविकांनी येताना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नयेत. तसेच भारतीय संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे. तसे फलक जिल्ह्यातील २० मंदिरांच्या दर्शनी भागात लावण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
या मंदिरांचा समावेश
रत्नागिरी: श्री नवलाई देवी मंदिरी-नाचणे, श्री साई मंदिर गाेडावून स्टाॅप-नाचणे, श्री विश्वेश्वर मंदिर, पिंपळवाडी – नाचणे, श्री नवलाई मंदिर, पिंपळवाडी-नाचणे, श्री ज्याेतिबा मंदिर-पेठकिल्ला, काशीविश्वेश्वर देवस्थान – राजीवडा, श्री दत्त मंदिर – खालची आळी, दक्षिणाभिमुख मारुती मंदिर – मारुती मंदिर. श्री साई मंदिर माेडेवाडी – मिरजाेळे, श्रीकृष्ण मंदिर, श्री महापुरुष मंदिर वरचीवाडी- मिरजाेळे, श्रीराम मंदिर-पावस, श्री अंबा माता मंदिर, श्री मरुधर विष्णू समाज सभागृह, श्री चंडिका माता – गणपतीपुळे, श्री साेमेश्वर सुकाई एन्डाेमेंट ट्रस्ट, सड्ये-पिरंदवणे, श्री परशुराम मंदिर – परटवणे, स्वयंभू श्री महालक्ष्मी देवस्थान – कारवांचीवाडी.
राजापूर : श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, श्री निनादेवी मंदिरी, श्री कामादेवी, श्री लक्ष्मीनारायण मंदिर – गुजराळी, श्री चव्हाटा मंदिर – जवाहर चाैक, श्री महाकाली मंदिर – आडिवरे, श्री कनकादित्य मंदिर – कशेळी, श्री सत्येश्वर मंदिर – कशेळी, श्री जाकादेवी मंदिर – कशेळी, श्री स्वामी समर्थ मठ – उन्हाळे.
चिपळूण : श्री गणेश मंदिर, मावळतवाडी-कालुस्ते, श्री हनुमान मंदिर, कुंभारवाडी – भिले, श्री देव सिद्धेश्वर मंदिर – भिले, श्रीदेव महादेव भानाेबा कालेश्री देवस्थान-भिले, श्री लक्ष्मीकांत देवस्थान – गांग्रई, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर – गांग्रई, श्रीदत्त मंदिर, दत्तवाडी-गांग्रई, श्री खेम वाघजाई मंदिर, बिवली-करंबवणे, श्री गणेश उत्कर्ष मंडळ, बांद्रेवाडी-मालदाेली, श्रीदेव जुना कालभैरव मंदिर, श्री विंध्यवासिनी मंदिर – रावतळे, श्री शिव मंदिर, श्री काळेश्री मंदिर-कान्हे, श्री हनुमान मंदिर-पिंपळी, श्री हनुमान मंदिर – पेढांबे, श्री गणेश मंदिर-नांदिवसे, श्री रामवरदायिनी मंदिर-दादर, श्री मुरलीधर मंदिर, श्री रामवरदायिनी मंदिर-दसपटी.
www.konkantoday.com