गाडीचे कर्ज फेडण्यासाठी घेतलेले पैसे परत न करता फसवणूक ,एका विरुध्द गुन्हा दाखल

गाडीचे कर्ज फेडण्यासाठी घेतलेले सात लाख रुपयांची रक्कम परत न केल्याने संतोष विश्वनाथ जगदाळे (ऱा शिवाजीनगर रत्नागिरी) यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे यातील फिर्यादी प्रियंका विजय साळवी (६५ रा. तेलीआळी, रत्नागिरी यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपी जगदाळे यांचे फिर्यादीच्या कुटूंबाशी घरगुती संबंध होते आरोपी जगदाळे याने फिर्यादी प्रियंका त्यांच्याकडून गाडीचे कर्ज भरण्यासाठी परत बोलीवर पैसे मागितले फिर्यादी यांनी आपल्या पतीच्या युनियन बँकेच्या अकाऊंटमधून चेकद्वारे सात लाख रु आरोपी जगदाळे यांना उसने दिले होते. हे पैसे काही महिन्यांनी परत करणार असल्याचे संतोषने प्रियंका यांना सांगितले होते. दरम्यान हे पैसे संतोषने परत न करता आपला फोनही बंद करून ठेवला त्यामुळे आपले या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रियंका यांनी शहर पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button