
दापोलीत इमारतीच्या बंद गाळ्यात वृद्धाचा मृत्यू
दापोली : शहरातील स्वामी समर्थ हॉस्पिटलच्या बाजूला बंद स्थितीत असलेल्या इमारतीच्या गाळ्यात शंकर धावले या 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. 3 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर धावले राहणार नानटे कांबळेवाडी हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. तेथील स्थानिक लोकांनी उपचाराकरिता त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे आणले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली असता ते मयत झाल्याचे घोषित केले. याची खबर मयत व्यक्तीचा भाऊ काशिनाथ धावले यांनी पोलिस ठाण्यात दिली. दापोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत.