
दापोली तालुक्यातील कोंढे येथे वस्तीला गेलेल्या एसटीच्या टाकीतून डिझेलची चोरी.
दापोली तालुक्यातील कोंढे येथे वस्तीच्या गाडीतून सुमारे साडेचार हजार रुपयांचे ५० लिटर डिझेल चोरी झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. हा प्रकार ४ ते ५ मार्चदरम्यान रात्री घडला. दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४ मार्च रोजी सायंकाळी ६ ची दापोली-कोंढे ही एसटी कोंढे येथे रात्री ९ वा. पोहोचली.
ही बस कोंढे येथे वस्तीला असते. ५ मार्च रोजी सकाळी १०.३० वा. कोंढे येथे उभ्या असलेल्या बसच्या डिझेल टाकीचे कुलूप उघडे असल्याचे चालक आशिष मळेकर यांच्या लक्षात आले. यानंतर पाहणी केली असता ५० लीटर डिझेल टाकीचे झाकण उघडून चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.www.konkantoday.com




