रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अनंत गीते यांना जाहीर?
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी अनंत गीते यांना जाहीर झाली आहे.गत लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना पराभूत करत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता. परंतु, त्यावेळी विजयासाठी त्यांची दमछाक झाली होती. रायगड मतदारसंघातील सर्वच तालुक्यांत उलटसुलट राजकीय समीकरणे जुळवून तटकरेंनी विजयश्री खेचून आणली होती. हे आव्हान तटकरे कसे पेलतात हे आगामी निवडणुकीत दिसेल; मात्र गीतेंच्या उमेदवारीने लढत नक्कीच लक्षणीय ठरणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपले नाव जाहीर केले असल्याची माहिती अनंत गीते यांना माध्यमांना दिली. सहा वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेल्या अनंत गीते यांना उमेदवार बनवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तयारीला लागा हा आदेश मिळाल्याने रायगड मतदारसंघात लक्षणीय लढत पाहायला मिळणार आहे.
www.konkantoday.com