रत्नागिरीजवळील दांडेआडोम येथील कार्तिकस्वामी मंदिर यात्रेसाठी सजले


दोन-तीन वर्षानी जुळून येणारा कार्तिक स्वामी दर्शनाचा योग यावर्षी रविवार 26 व सोमवार 27 नोव्हेंबर रोजी आला असून रत्नागिरी शहरानजीकच्या दांडेआडोम येथील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.रत्नागिरी शहरातील मारुती मंदिरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर दांडेआडोम हे गाव आहे. गावातील कार्तिकस्वामी मंदिर निसर्गरम्य वातावरणात आहे. कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र यांचा संगम जुळून येतो, त्यादिवशी कार्तिकस्वामींचे दर्शन शुभ व फलदाई समजले जाते. काही वर्षापर्यंत या मंदिरात जाण्यासाठी फक्त छोटासा रस्ता होता.

परंतु ग्रामस्थांनी या मंदिरापर्यंत गाड्या जातील असा रस्ता तयार करुन घेतला आहे. त्यामुळे कार्तिकस्वामी दर्शनाचा लाभ अनेकजण या मुहुर्तांवर घेत असतात. यावर्षी कार्तिक रविवार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.53पासून सोमवार 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.35पयर्र्त कार्तिक स्वामी दर्शनाचा योग आहे. भाविकांनी या सुवर्ण मुहुर्तावर स्वामींचे दर्शन घ्यावे असे आवाहन दांडेआडोम ग्रामस्थांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button