अमरनाथ गुफेत पहिल्यांदाच पोहोचली कार, महिंद्राच्या दमदार गाडीची चर्चा, भाविकांची यात्रा सोपी होणार
अमरनाथ यांत्रेकरुंसाठी खुशखबर आहे. श्री अमरनाथच्या पवित्र गुंहेपर्यंत रस्ता तयार करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. यातच खेड्यातील रस्त्यापासून शहराच्या एक्सप्रेसवेपर्यंत जादू पसरवणारी महिंद्रा बोलेरो आता अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचणारे पहिले वाहन ठरले आहे.एक एसयूव्ही म्हणून, महिंद्रा बोलेरो, जी यशस्वीपणे उंचावर पोहोचली आहे, तिच्या खडतर राइडिंगसाठी देखील ओळखली जाते. भारतीय लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO त्यांच्या बीकन प्रकल्पांतर्गत काश्मीरमधील लिडर व्हॅलीच्या बर्फाच्छादित हिमालयात असलेल्या अमरनाथ गुहा मंदिरापर्यंतचा रस्ता रुंदीकरणावर काम करत आहे.
www.konkantoday.com