
महाराष्ट्र क्रांती सेनेच्या माध्यमातून बचतगटांना गंडा घालणारा फरारी भामटा गजाआड
महाराष्ट्र क्रांती सेनेच्या माध्यमातून शासनातर्फे महिला बचतगटातील महिलांना सवलतीच्या दरात शिलाई मशिनसह घरकुल देण्याचे आमिष दाखवत तब्बल ९३८ महिलांची २३ लाख रुपयांची फसवणूक करून फरारी झालेल्या बबन मारूती मोहिते (रा. वाराणी-कासार, बीड) या भामट्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने मुंबई येथून गजाआड केले. बुधवारी रात्री त्यास येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या भामट्याकडून फसवणुकीचे अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र क्रांती सेना संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून १६०० रुपयांमध्ये महागडी हातशिलाई मशिन, घरकुले, घरघंटी व गोठा सवलतीच्या दरात देण्याचा फंडा वापरत तालुक्यातील महिला बचतगटातील तब्बल ९३८ महिलांची २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संदीप शंकर डोंगरे (वाराणी-कासार, बीड) याच्या यापूर्वीच मुसक्या आवळल्या होत्या. यातील बबन मोहिते हा फरार झाला होता. www.konkantoday.com