
रत्नागिरीत हनुमान जयंती जल्लोष्यात साजरी
रत्नागिरीतील दक्षिणमुखी हनुमान मंदीर हे प्राचीन मंदीर असून या ठिकाणी हनुमान जयंती ही दरवर्षी जल्लोषात साजरी करण्यात येते.गेली दोन वर्ष कोरोना संकटा मूळे ती सध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. परंतु यावर्षी मात्र मंदीर समिती तसेच भाविकांचा आनंद हा द्विगुणित असल्याचे चित्र पाहायला मिळाले मंदिरात तर भाविकांची आलोट गर्दी होतीच पण या मंदिरातून मारुतीरायांची मिरवूणूक निघते ती तर अप्रतिम अशीच होती. या मिरवणुकीत वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले होते.कोंबडा ,शहामृग यांच्या मुखवटा वेशभूषा, इत्यादी या मिरवणुकीत सहभागी होते तसेच हनुमानकालीन शीर धडावेगळे असलेला एक प्रसंग या मिरवणूकीचे खास वैशिष्ट होते या मिरवणुकीत भाविक मोठ्या प्रमाणावर सामील झाले होते
www.konkantoday.com
पहा व्हीडीयो👇